मुंबई : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सानिया सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे त्यामूळे ती पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.


शस्त्रक्रियेबाबत निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स' पुरस्काराच्या दिवशी सानियाने पत्रकारांशी संवाद साधला.  मी गुडघ्यांच्या दुखापतीतून सावरत आहे.


यासाठी शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही याबाबत मी लवकरच निर्णय घेणार असल्याचे तिने यावेळी सांगितले.


विश्रांतीसाठी दोन आठवडे


हे माझ्यासाठी एक कठीण वर्ष राहिल, यामध्ये माझे सहकारीही जखमी होत गेले. मी सध्या गुडघ्याच्या जखमेपासून त्रस्त आहे. मी जवळपास एक महिना टेनिसपासून दूर आहे ,माझ्याकडे विश्रांतीसाठी दोन आठवडे आहेत असेही तिने यावेळी सांगितले.


कामगिरीबद्दल आनंदी 


ती पुढे म्हणाली,जखमी राहूनही मी टॉप १० मध्ये राहिल्याचे समाधाना आहे म्हणून मी या वर्षीच्या कामगिरीबद्दल आनंदी आहे.


देशाची अव्वल महिला दुहेरीतील खेळाडूंमध्ये सानियाने नंबर वन रॅंकिंगने सुरुवात करत अखेरी ती आता नवव्या स्थानावर आहे.


राममध्ये क्षमता 


डेव्हिस चषक कर्णधार महेश भूपती यांनी सांगितले की, रामकुमार रामनाथनमध्ये टॉप १०० मध्ये स्थान मिळवण्याची क्षमता आहे. रामचे (रामकुमार रामनाथन) सत्र छान राहिले आहे.


पुढचे २ वर्षे त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. भूपतीने सांगितले की, तो युवा आहे, म्हणून आम्ही त्याला थोडा वेळ देत आहोत. २३ वर्षाचा रामनाथन एटीपी सिंगलमध्ये १४८ व्या स्थानावर आहे.