नवी दिल्ली : ७ ऑक्टोबर रोजी झहीर खान आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. जुने सहकारी आणि क्रिकेट प्रेमीसह लाखो चाहत्यांनी झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर झहीरच्या वाढदिवशीचा सौरव गांगुलीच्या शर्ट काढतानाचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ १३ जुलै २००२ चा असून हा क्षण आजही कोणीही भारतीय क्रिकेट फॅन विसरू शकले नाहीत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये जहीर खान आणि मोहम्मद कैफ हे मैदानात तर सौरव गांगुली लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये आपले टी शर्ट काढून उडवत आहेत. आजच्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे एक गुपित लपले आहे. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर भारतीय टीमने इंग्लंडला मात दिली होती. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरविले आणि नेटवेस्ट सीरिज आपल्या नावावर केली.


१५ वर्षांपूर्वी खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियाला अनेक नायकांना मिळाले. या सामन्यात युवराजसिंग, मोहम्मद कैफ आणि झहीर खान हे नायक म्हणून उदयास आले. या सामन्याचे वास्तविक नायक युवराजसिंग आणि मोहम्मद कैफ होते.  परंतु झहीर खानच्या वाढदिवसाच्या दिवशी व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण वेगळे आहे. या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात फक्त दोन धावांची गरज होती. दुसर्या बाजूला उभे असलेला झहीर खान मोहम्मद कैफला स्ट्राइक देऊ इच्छित होता. त्याने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. पण ओव्हर थ्रोमुळे भारतीय टीमला २ धावा मिळाल्या. यामुळे भारताने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळविला. म्हणजेच झहीर खानच्या शेवटच्या दोन धावांमूळे सामना जिंकला होता.
त्याच आनंदात सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहून आपले टी शर्ट काढून हवेत उडविले होते.



युवराज सिंगने ६९ धावांची खेळी केली. या विजयाची हिरो, मोहम्मद कैफने आपल्या कारकिर्दीत प्रथमच सामनावीर म्हणून विजय मिळविला.