दुबई : किंग्स इलेवन पंजाबचा मुख्य कोच अनिल कुंबळेने 'यूनिवर्स बॉस' ख्रिस गेल अजूनही संघात खेळत नसल्याने त्याच्या न खेळण्याबाबत उत्तर दिलं आहे. गुरूवारी इंडियन प्रीमियर लीग 2020 चा सामना गेल खेळणार होता. पण फूड पॉइजनिंगमुळे तो खेळू शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंबळेने सनराइजर्स हैदराबादच्या 8 व्या ओव्हरमध्ये कमेंटेटर्सला म्हटलं की, ख्रिस गेल आजच्या सामन्यात खेळणार होता. पण तो आजारी आहे. त्याला फूड पॉइजनिंग (Food Poisoning) झालं आहे. त्यामुळे तो प्लेईंग इलेवनमध्ये नाही.'


आयपीएलमधील स्टार क्रिकेटर असलेल्या गेलने आतापर्यंत या सीजनचा एकही सामना खेळलेला नाही. हैदराबादच्या विरुद्ध तो खेळणार होता. ग्लेन मॅक्सवेलच्या जागी त्याला संघात घेतलं जाणार होतं. पण आजारी असल्यामुळे तो खेळू शकला नाही.


गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 125 सामन्यांमध्ये 151.02 चया स्ट्राईक रेटने 2,969 रन केले आहेत. या दरम्यान त्याने 6 शतक आणि 29 अर्धशतक ठोकली आहेत. त्याचा आयपीएलमधील सर्वाधिक स्कोर 175* रन आहे. जे त्याने पुणे वॉरियर्सच्या विरुद्ध केले होते. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 326 सिक्स मारले आहेत.