स्मृति मनधनाचं ऐतिहासिक शतक; असं शकत ठोकणारी बनली पहिली महिला क्रिकेटर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच गाजला आहे.
दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच गाजला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मृती मनधनाने शानदार शतक झळकावलं आहे. मनधनाच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिले शतक आहे. तिने 170 चेंडूत 18 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने हे शतक ठोकलं आहे.
मुख्य म्हणजे मनधनाने एलिसी पेरीवर चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं. भारताकडून पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी ती पहिला महिला क्रिकेटर बनली आहे. तर विराट कोहलीनंतर मनधना दुसरी क्रिकेटपटू आहे. कोहलीने 2019 मध्ये कोलकाता कसोटीत बांगलादेशविरुद्ध 136 धावा केल्या.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्फोटक फलंदाजी करत मंधानाने केवळ 51 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने अर्धशतक केलं. या खेळाडूने डार्सी ब्राऊनच्या बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये चार चौकार लगावले. मनधनाने शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 93 धावा केल्या.
केवळ चौथ्या कसोटी सामन्यात त्याने पहिलं शतक झळकावलं
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या मंधानाने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतकही झळकावलं. तिने 2014 मध्ये इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. हा सामना तीन महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या ब्रिस्टल मैदानावर खेळला गेला होता, ज्यात मनधनाने शानदार 78 धावा केल्या होत्या. हा सामना अनिर्णित राहिला.