T20 World Cup: का टीम इंडियावर भारी पडली किवी टीम!
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला.
दुबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला. या विजयाचं श्रेय त्याने संघाच्या अष्टपैलू कामगिरीला दिलं. संपूर्ण सामन्यात किवी टीमने भारताला दडपणाखाली ठेवलं होतं.
टीम इंडियावर भारी पडली किवी टीम
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावत 110 रन्सचं करता आले. या लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 2 विकेट्स गमावत लक्ष्य गाठलंय. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 49 धावांची शानदार खेळी खेळली आणि उत्तम गोलंदाजी करताना ईश सोधीने 2 बळी घेतले.
भारताच्या पराभवाला कारणीभूत गोष्ट
सामन्यानंतर केन विलियम्सन म्हणाला, "प्रत्येक सामन्यापूर्वी रणनीती बनवली जाते. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अष्टपैलू कामगिरीने हा विजय मिळवला. आम्ही संपूर्ण सामन्यात त्याला दडपणाखाली ठेवलं आणि आमच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली."
किवींच्या गोलंदाजीपुढे ढेपाळली टीम इंडिया
टीमच्या गोलंदाजी आक्रमणाचं कौतुक करताना केन विलियम्सन म्हणाला, "आमच्याकडे दोन चांगले स्पिनर आहेत आणि गोलंदाज एक युनिट म्हणून प्रभाव पाडण्यात यशस्वी झाले आहेत. इश सोधी हा मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि या परिस्थितीत फिरकीपटू खूप उपयुक्त ठरत आहेत.