Riley Meredith : आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) सिझनला सुरुवात झाली आहे. प्रत्येक टीमचे एक-एक सामने खेळून झाले आहेत. दरम्यान सालाबादप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमने पहिला सामना गमावला. शनिवारी मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत (Chennai Super Kings) होणार आहे. दरम्यान याच सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. दुसऱ्या सामन्यापूर्वीच मुंबईच्या टीममध्ये एका धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. 


अचानक धाकड खेळाडूची एन्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा खेळाडू झाय रिचर्डसनच्या (Jhye Richardson) जागी रिले मेरेडिथचा (Riley Meredith) टीममध्ये समावेश केला आहे. याबाबतची माहिती मुंबई इंडियन्सने गुरुवारी दिली. मुंबई इंडियन्सने रिले मेरेडिथ याला दीड कोटींना आपल्या ताफ्यात घेतलं होतं. रिले मेरेडिथने यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज कडून खेळला होता.


चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रिले मेरेडिथ सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 26 वर्षीय मेरेडिथने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत एक वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय करियरमध्ये एकूण 8 विकेट घेतल्या आहेत. 


Jhye Richardson दुखापतग्रस्त


ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा गोलंदाज झाय रिचर्डसन दुखापग्रस्त होता. गेल्या काही काळापासून हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवत होती. यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला भारत विरूद्धच्या वनडे सिरीजमधून वगळण्यात आलं होतं. रिचर्डसनच्या जागी मुंबईने रिले मेरेडिथचा ताफ्यात समावेश केला आहे. 


पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी


मुंबई इंडियन्स टीमला पुढील सामना शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळायचा आहे. मुख्य म्हणजे मुंबई विरूद्ध चेन्नईच्या सामन्याला आयपीएलचा एल क्लासिको सामना असं म्हटलं जातं. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने 1 सामना खेळला असून त्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


बुमराहची उणीव भासणार नाही?


मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे IPL 2023 मधून बाहेर आहे. मेरेडिथ हा टी-20 फॉरमॅटमध्ये धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने बीबीएलमध्ये 152.2 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. रिलेने आयपीएलमध्ये 13 सामने खेळले असून त्यात 9 च्या इकॉनॉमीमध्ये 12 विकेट घेतल्यात.