Babar Azam : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या टीमचा वर्ल्डकपच्या स्पर्धेत सलग दुसरा पराभव झाला आहे. टीम इंडियाने केलेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमने देखील पाकिस्तानचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने 62 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान या दुसऱ्या पराभवानंतर पाक कर्णधार बाबर आझम संतापला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम आपल्या टीमच्या कामगिरीवर नाराज दिसत होता. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने आपल्या टीममधील उणिवा समोर मांडल्या. याशिवाय त्याने पराभवाचे खापर नव्या खेळाडूवर फोडलंय. बाबर आझमने या पराभवासाठी युवा खेळाडूला जबाबदार धरलंय.


काय म्हणाला बाबर आझम?


ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना ओसामा मीरने डेव्हिड वॉर्नरचा कॅच सोडला होता. त्यानंतर वॉर्नरने तुफानी इनिंग खेळली होती. पराभवानंतर कर्णधार बाबर आझमने संपूर्ण दोष वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणाऱ्या खेळाडूवर टाकला.


ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या झालेल्या पराभवानंतर बाबर आझम म्हणाला की, “जर तुम्ही वॉर्नरसारख्या खेळाडूचा कॅच सोडला तर तो तुम्हाला सोडणार नाही. हे एक मोठं स्कोअरिंग ग्राउंड आहे. प्रकाशामध्ये बॉल चांगला येत होता. मधल्या ओव्हर्समध्ये मोठी भागीदारी करता आली नाही. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये बॉल आणि मधल्या ओव्हर्समध्ये फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे."


ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना शाहिन शाह आफ्रिदी पाचवी ओव्हर टाकत होता. त्यावेळी मोठी शॉर्ट खेळण्याच्या नादात डेव्हिड वॉर्नरने चुकीचा फटका खेळला. यावेळी वॉर्नरचा एकदम सोपा कॅच होता आणि खाली पाकिस्तानचा उसामा मीर हा खेळाडू होता. उसामा एकदम सहज हा कॅच घेईल असं वाटत होतं मात्र कॅच पकडण्यात त्याला अपयश आलं. यानंतर वॉर्नरने तुफान फलंदाजी करत सेंच्युरी झळकावली. 


वर्ल्डकपमध्ये पहिला सामना खेळत असलेल्या मीरने वॉर्नरचा झेल सोडला. त्यामुळे यावर बाबरने नाराजी व्यक्त केली. याशिवाय बाबर आझमने देखील स्टिव्ह स्मिथचा एक कॅच सोडला होता. 


पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव


या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 367 रन्स केले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने सर्वाधिक रन्स केल्या. वॉर्नरने 163 रन्सची खेळी केली. तर मार्शने 121 रन्सचं योगदान दिलं.


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीने चांगली फलंदाजी केली. अब्दुल्ला शफीकने 64 रन्सचं योगदान दिलं. तर इमाम-उल-हकने 70 रन्स केले. मात्र याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस 62 रन्सने पाकिस्तानचा पराभव झाला आहे.