Rohit Sharma: हार्दिकसंदर्भातील वाद काही संपेना...; रोहित मुंबईसोबतचा 13 वर्षांचा प्रवास संपवणार?
Rohit Sharma: मुंबई टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला ( Rohit Sharma ) वगळून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. असं असूनही रोहित शर्मा खेळाडू म्हणून मुंबई कडून खेळणार आहे.
Rohit Sharma: मार्च महिन्यात आयपीएलच्या नव्या सिझनला सुरुवात होणार आहे. दरम्यान या सिझनपूर्वीच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठ्या घटना घडल्या. मुंबई टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला ( Rohit Sharma ) वगळून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. असं असूनही रोहित शर्मा खेळाडू म्हणून मुंबई कडून खेळणार आहे. दरम्यान पुढच्या सिझनमध्ये रोहित ( Rohit Sharma ) मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.
रोहित सोडणार मुंबईची साथ?
रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) सोबतचा 13 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पुढील वर्षी संपण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. वयाच्या 17 व्या वर्षी रोहित शर्मावर कोणती टीम बोली लावणार याकडे लक्ष असणार आहे.
पुढच्या वर्षी होणार मेगा ऑक्शन
पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. यावेळी प्रत्येक टीमला फक्त चार खेळाडू रिटेन ठेवण्याचा अधिकार असतो. यामध्ये तीन भारतीय आणि एका विदेशी खेळाडूचा समावेश असणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन करू शकते. गेल्या वेळी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) रोहित शर्माला 16 कोटींची मोठी किंमत देऊन रिटेन केलं होतं. सध्याच्या परिस्थितीत मुंबईची ( Mumbai Indians ) टीम रोहितला डावलून पुढे जाताना दिसतेय. त्यामुळे पुढच्या सिझनमध्ये रोहितला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians ) प्रशिक्षक मार्क बाउचर यांनीही रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याबाबत मौन सोडलंय. बाऊचर यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा ( Rohit Sharma ) एक खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे तो दबावातून मुक्त झालाय. दरम्यान याबाबत रोहित शर्माची पत्नी रितिका हिला मार्क बाउचरचं हे विधान आवडलं नाही. यावेळी तिने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळे आता एकंदरीत या परिस्थितीवरून असं स्पष्ट होतंय की, रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) संबंध आता वेगळे होण्याची शक्यता आहे. या वर्षीही दिल्ली कॅपिटल्सला रोहित शर्मावर बोली लावायची असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) रोहितला रिटेन केलं नाही.