India vs South Africa 3rd T20: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही देशांमध्ये आज शेवटचा आणि तिसरा टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेट्सने विजय झाला. त्यामुळे सिरीज बरोबरीत सोडवण्यासाठी आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. अशातच आजच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. 


ओपनिंग जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वीच्या सामन्या ऋतुराज गायकवाड आजारी असल्यामुळे प्लेईंग 11 चा भाग नव्हता. मात्र आजच्या तिसऱ्या सामन्यात त्याला स्थान दिलं जाऊ शकतं. दुसऱ्या टी-20 मध्ये त्याच्या जागी आलेल्या यशस्वी जयस्वालला खातंही उघडता आलं नव्हतं. तर दुसरा ओपनर म्हणून शुभमन गिलला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते. यानंतर तिलक वर्मा यांना तिसरं स्थान मिळू शकतं. 


कशी असेल टीम इंडियाची मिडल ऑर्डर?


यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः चौथ्या क्रमांकावर उतरणार आहे. सूर्यकुमारने गेल्या टी-20 सामन्यात स्फोटक 56 रन्स केले होते. यानंतर जितेश शर्माला देखील टीममध्ये संधी मिळू शकणार आहे. जितेशकडे विकेटकीपरची जबाबदारीही दिली जाऊ शकते. फिनिशरची भूमिका रिंकू सिंगला दिली जाऊ शकते. रिंकूने गेल्या सामन्यात 39 बॉल्समध्ये जलद 68 रन्स केले होते. 


गोलंदाजीमध्ये होऊ शकतो बदल


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात स्पिनर्सची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली जाणार आहे. तर या सामन्यात कुलदीप यादवच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या टी-20 सामन्यात कुलदीपला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.


तिसऱ्या टी-20 साठी कशी असेल टीम इंडियाची संभाव्य Playing 11:


शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार