World Cup 2023 News: सध्या एशिया कप ( Asia cup 2023 ) सुरु असून येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप ( ICC World Cup ) सुरु होणार आहे. नुकतंच मंगळवारी टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही खेळाडू अशे आहेत ज्यांना कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) संपूर्ण वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकणार नाही. त्यांना केवळ सामना सुरु असताना वॉटर बॉय म्हणून उपस्थित राहू शकतात. पाहूया हे खेळाडू कोण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपसाठी नुकतंच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आलाय. मात्र यामध्ये काही खेळाडूंना रोहित शर्मा ( Rohit sharma ) प्लेईंग 11 मध्ये संधी देण्याची शक्यता कमी आहे


मोहम्मद शमी



वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियासाठी एकही सामना खेळू शकणार नाही. कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करेल. त्याचवेळी हार्दिक पांड्या चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारणार आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीला 2023 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनणे कठीण होईल. वर्ल्डकप 2023 च्या सामन्यांमध्ये शार्दुल ठाकूरला मोहम्मद शमीपेक्षा प्राधान्य दिलं जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत मोहम्मद शमी संपूर्ण वर्ल्डकप 2023 दरम्यान केवळ टीममधील खेळाडूंना पाणी देताना दिसणार आहे.


सूर्यकुमार यादव



सिलेक्टर्सने सूर्यकुमार यादवला 2023 च्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये स्थान दिलंय. परंतु श्रेयस अय्यरच्या उपस्थितीमुळे त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झालीये. टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांची जागा निश्चित मानली जाते. सूर्यकुमार यादवसाठी मधल्या फळीत कोणतीही जागा रिक्त नाही. त्यामुळे सूर्या संपूर्ण स्पर्धेत मैदानावर खेळाडूंना पाणी देताना दिसण्याची शक्यता आहे.


अक्षर पटेल



टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेल 2023 ची वर्ल्डकपमध्ये निवड झाली असून रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात येईल. अशा स्थितीत अक्षर पटेलला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं कठीण होईल. रोहित देखील अक्षर पटेलऐवजी कुलदीप यादवला प्राधान्य देईल. त्यामुळे अक्षर पटेल संपूर्ण वर्ल्डकपमध्ये वॉटर बॉय म्हणून दिसू शकतो.