आयपीएल लिलाव : हे 2 नवे खेळाडू एका रात्रीत झाले करोडपती
आयपीएलमध्ये 2 नव्या खेळाडूंना संधी
मुंबई : IPL 2019 साठी जयपूरमध्ये सध्या खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यामध्ये एकूण 351 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. ज्यामध्ये 228 खेळाडू हे भारतीय आहेत. आयपीएलच्या 8 टीम खेळाडूंवर बोली लावणार आहेत. ज्यामध्ये 119 कॅप्ड, 230 अनकॅप्ड आणि 2 असोसिएट नेशनचे खेळाडू आहेत. सगळ्यात जास्त 2 कोटी बेस प्राईस असलेले 10 खेळाडू आहे. यामध्ये एकही भारतीय नाही.
मुंबईचे शिवम दूबे आणि वरुण चक्रवर्ती असे दोन नावे आहेत ज्यांनी आयपीएलमध्ये आगमन केलं आहे. आगमन करताच त्यांनी एक इतिहास रचला आहे. शिवम दुबेला बंगळुरुने 5 कोटीला तर वरुण चक्रवर्तीला पंजाबने 8.4 कोटीला विकत घेतलं आहे. वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही.
-हनुमा विहारी (2 कोटी) शिमरॉन हेटमायर (4.2 कोटी) कार्लोस ब्रॅथवेट (5 कोटी) गुरकीरत सिंह (50 लाख) मोजिज हेनरीकेस (1 कोटी) अक्षर पटेल (5 कोटी) जॉनी बेयरस्टो (2.2 कोटी) निकोलस पूरन (4.2 कोटी) ऋद्धिमान साहा (1.2 कोटी)
लिलावात विकले गेलेले खेळाडू
- 20 लाख बेस प्राईस असलेला शिवम दुबेला बंगळुरुने 5 कोटींना खरेदी केलं.
- सरफराज खानला 25 लाखांना पंजाबने खरेदी केलं.
- अनमोलप्रीत सिंहला 80 लाखांना खरेदी करण्यात आलं.
- 50 लाख बेसप्राइज असलेला मोहित शर्माला 5 कोटींना चेन्नईने खरेदी केलं.