मुंबई : आयपीएल 2022 पंधराव्या सीझनची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. 10 संघांची जोरात तयारी सुरू आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये  सुरेश रैना, हनुमा विहारी, अमित मिश्रा आणि ईशांत शर्मासोबत काही खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत. बरं पर्याय खेळाडू म्हणूनही त्यांचा विचार कोणत्याही संघाने केला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याने आता हनुमा विहारीसोबत 7 खेळाडू ढाका प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी परवानगी मागत आहेत. हनुमा,  बाबा अपराजित, अभिमन्यु ईश्वरन, परवेज रसूल, अशोक मेनारिया, चिराग आणि गुरिंदर सिंह सर्वांनीच ही मागणी केली आहे. 2022 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर आता DPL मध्ये खेळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


दिनश कार्तिक खेळलाय DPL 
ढाका प्रीमियर लीग 50 ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येतो. यामध्ये पाकिस्तान टीमचा प्लेअर मोहम्मद हफीज आणि झिम्बावेचा खेळाडू सिकंदर रजा देखील खेळणार आहेत. दिनेश कार्तिक, मनोज तिवारी, यूसुफ पठान ढाका प्रीमियर लीग खेळले आहेत. 


हम किसी से कम नहीं! सर्वाधिक विकेट्स घेणारी ठरली जगातील पहिली महिला


हनुमा विहारीनं श्रीलंके विरुद्ध कसोटी सामना खेळला आहे. ही सीरिज 2-0 ने टीम इंडियाने जिंकली आहे. आता हनुमा आपल्या घरी हैदराबादला पोहोचला आहे. थोडा ब्रेक घेऊन आता हनुमा ढाकाला पोहोचणार आहे.