मुंबई : गेल्या काही वर्षांत अनेक युवा खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघात प्रवेश केला आहे. यातील अनेक खेळाडू केवळ त्यांच्या कामगिरीनेच चर्चेत नसतात, तर ते अफेअर्स, प्रेमकथा आणि गर्लफ्रेंड्समुळेही सर्वाधिक चर्चेत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलच्या यात सतत चर्चेत असलेलं एक नाव आहे. जो सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. सतत या दोघांच्या डेटींगच्या बातम्या समोर येत आहेत. 


शुभमन गिलशिवाय ऋषभ पंत, ईशान किशन, केएल राहुलसह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. ऋषभ पंतने स्वतः ईशा नेगीसोबतच्या नात्याबद्दल चाहत्यांना सोशल मीडियावर सांगितले होते. अलीकडेच केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतच्या प्रेमाची कबुली ही दिली आहे. 



ऋषभ पंत आणि ईशा नेगी


महेंद्रसिंग धोनीनंतर, ऋषभ पंतने मैदानावर उतरुन जबरदस्त कामगिरी केली.  नुकत्याच झालेल्या केपटाऊन कसोटीत कोणीही खेळले नसताना त्याने शतक झळकावले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.



त्यातच दुसरीकडे ऋषभ पंत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही सगळ्यांच लक्षवेधून घेत आहे.  तो गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. भारतीय क्रिकेटरचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर समोर आले आहेत. मात्र, दोघांनीही कधीही अधिकृतपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाही.


ईशान किशन -अदिती हुंडिया


आयपीएलमध्ये आपली छाप पाडल्यानंतर टीम इंडियात स्थान निर्माण करणारा ईशान किशन आपल्या खेळामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडियासोबतच्या नात्याबद्दलही तो चर्चाचा विषय ठरतो.


अदिती मिस इंडिया राहिली आहे. फॅशन आणि ग्लॅमरच्या जगात ती एक प्रसिद्ध चेहरा आहे. दोघेही जवळपास 2-3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि सोशल मीडिया पोस्टवरही दोघांना एकत्र पाहिले जाऊ शकते.



केएल राहुल-अथिया शेट्टी


अलीकडेच भारताच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलेला केएल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी यांच्यातील नातेसंबंधाच्या बातम्यांनीही काही दिवसांपासून जोर धरला आहे.


अलीकडेच अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या तडप या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये राहुलसोबत दिसली. यावेळी संपूर्ण शेट्टी कुटुंबासोबत केएल राहुल दिसून आला. याआधी भारतीय क्रिकेटपटूने अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट टाकून आपले प्रेम व्यक्त केले होते.



आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात, भारतीय गोलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार दीपक चाहरने दुबई स्टेडियममध्ये त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केले. दीपक चहरने फिल्मी स्टाईलमध्ये जयावरील प्रेम व्यक्त केले.  गुडघ्यावर बसून त्यांने जया भारद्वाजला प्रेक्षकांसमोर प्रपोज केले. जयाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि लवकरच ते लग्नही करणार आहेत.