लंडन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा आज महत्त्वाचा सामना आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थिती हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेविरुद्धचा हा सामना जिंकायचा असेल तर भारताच्या गोलंदाजांना या क्रिकेटपटूंपासून सावध राहावे लागेल. त्यांची फलंदाजी संतुलित आहे. फलंदाजीच्या यादीत एबी डेविलियर्सशिवाय अनुभवी हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसिस आणि जे पी ड्युमिनीसारखे फलंदाज आहेत. 


दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमला जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७ हजार धावा केल्यात. यात २५ शतके आहेत. 


त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील गोलंदाजांची कामगिरी पुन्हा होऊन चालणार नाही. या फलंदाजांना लवकरात लवकर कसे बाद करता येईल याची रणनीती भारतीय गोलंदाजांनी आखायला हवी तसेच प्रत्यक्षात ती उतरवायलाही हवी.