मुंबई : वेस्ट इंडिजविरोधात आज दुसरी टी-20 खेळवली जाणार आहे. कोलकात्याच्या मैदानावर दुसरा सामना होणार असून टीम इंडिया सिरीज जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. दरम्यान सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. यावेळी रोहित ओपनिंग जोडीदार बदलण्याची शक्यता आहे.


हा खेळाडू करू शकतो ओपनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा ओपनर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी देऊ शकतो. ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे या सामन्यात ओपनिंगसाठी स्वतःसोबत रोहित ऋतुराज गायकवाडला सोबत घेण्याची शक्यता आहे. 


दुसरीकडे ईशान किशन (Ishan Kishan) काही चांगला खेळ करू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या टी-20मध्ये त्याला बाहेरचा रस्ता मिळण्याची शक्यता आहे. 


बीसीसीआय देखील ऋतुराज गायकवाडला रोहित शर्मासोबत ओपनर म्हणून मैदानात उतरवण्य़ाच्या विचार आहे. गेल्या वेळी टीम इंडियाचे फलंदाजी कोच विक्रम राठोर म्हणाले होते की, केएल राहुल बाहेर असल्याने या परिस्थितीत आमच्याकडे पर्याय म्हणून ऋतुराज गायकवाड आहे.


मधल्या फळीत कोण? 


तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. त्यानंतर चौथ्या स्थानी विकेटकीपर रिषभ पंत असणार हे निश्चित आहे. तर सूर्यकुमार यादव 5 व्या क्रमांकावर खेळेल. बॉलिंग ऑलराऊंडर दीपक हुड्डा 6 व्या स्थानी असेल. दीपक हुड्डाला संधी मिळाली तर वेंकटेश अय्यरला डच्चू मिळू शकतो. 


दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन 


रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, दीपक चहर, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार.