World Cup 2023: यंदाच्या वर्ल्डकमध्ये ( ICC Cricket World Cup 2023 )  टीम इंडियाचा खेळ उत्तम सुरु आहे. अवघ्या 2 विजयांनी टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. असं असूनही टीमच्या चिंतेत वाढ झाली आहे. आणि याचं कारण म्हणजे हार्दिक पंड्याला झालेली दुखापत. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) दुखापत झाली होती. यामुळे तो काही सामन्यांना मुकणार असून त्याच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार हे निश्‍चित मानलं जात होतं, मात्र तसं होणं शक्य नाहीये. हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) मैदानात परतण्यासाठी आणखी 2 आठवडे लागू शकतात. दरम्यान हार्दिकच्या जागी या खेळाडूचा संघात समावेश होण्याची शक्यता असून तशा चर्चाही रंगल्या आहेत. 


हार्दिक पंड्याची दुखापत चिंतेचा विषय


टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याला पूर्णपणे फीट होण्यासाठी किमान दोन आठवडे लागू शकतात. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, 'नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखालील मेडिकल टीम बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर त्याच्यावर देखरेख करतेय. दुखापत काहीशी गंभीर आहे. त्याची दुखापत बरी होण्यापूर्वी एनसीए त्याला सोडणार नाही. तो लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे.


हार्दिकच्या जागी हा खेळाडू उतरणार मैदानात?


दुसरीकडे टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेल ( Axar Patel ) पूर्णपणे तंदुरुस्त झालाय. अक्षर वर्ल्डकपच्या ( ICC Cricket World Cup 2023 )  टीमचा भाग होता, मात्र आशिया कप स्पर्धेत दुखापत झाल्यानंतर त्याला वगळावं लागलं होतं. यावेळी त्याच्या जागी आर अश्विनचा समावेश करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा हार्दिकच्या ( Hardik Pandya ) जागी अक्षर पटेलला संधी मिळू शकणार आहे. दरम्यान याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) अनुपस्थितीत अक्षर पटेलला वर्ल्डतकपच्या ( ICC Cricket World Cup 2023 )  टीममध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र हा निर्णय पूर्णपणे मॅनेजमेंटच्या हातात आहे.