मुंबई : पी.वी.सिंधुच्या खेळाचे आज असंख्य चाहते आहेत. पण  ती ज्या व्यक्तीची मोठी चाहती आहे त्या व्यक्तीशी तिची भेट झाली. आणि तिने त्या क्षणाला 'फॅन मूमेंट' म्हणऊन शेअर केला. आपल्याला माहित आहे पी वी सिंधुने भारताला अनेकदा विजय मिळवून दिला. तिच्या खेळाचे असंख्य चाहते आहेत. असं असताना पी वी सिंधु मात्र 'या' बॉलिवूड सुपरस्टारची मोठी चाहती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो अभिनेता आहे रणवीर सिंह. पी वी सिंधु रणवीर सिंहची खूप मोठी फॅन आहे. रणवीरचं कौतुक करताना पी वी सिंधु म्हणाली की, मला त्यांचा उत्साह भरपूर आवडतो. फोर्ब्स इंडिया टायकून ऑफ टूमॉरो इवेंटमध्ये पी वी सिंधु रणवीर सिंहला भेटली. जिथे रणवीरला युवा आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. 



सिंधुने हा क्षण सोशल मीडियावर शेअर करताना खूप कौतुक केलं. हा फोटो पुन्हा एकदा शेअर करताना रणवीरने म्हणलं की, खरंच हा माझ्याशी खूप आनंदाचा क्षण आहे. माझ्यासाठी देखील हा एक फॅन मूमेंट होता. पी वी सिंघु तू खरंच आम्हाला गर्व वाटेल असं काम केलं आहे. तुझा उत्साह देखील मला आवडतो. तू अशी चमकत राहा. 



रणवीर सिंह आता रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमात काम करणार आहे. 'सिम्बा' हा सिनेमा 'टेंपर' या तेलगु सिनेमाचा रिमेक आहे. यामध्ये रणवीर सिंहसोबत बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दिसणार आहे.