मुंबई : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयानंतर टीम इंडियात विविध चर्चाही समोर आल्या. दरम्यान विराट कोहलीने वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपच्या पराभवानंतर कर्णधारपदावरून पायउतार होण्याबाबत संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये चर्चा केली होती? इंग्लंडमध्ये World Test Championship दरम्यान अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोन खेळाडूंनी विराटच्या वागणुकीबद्दल जय शहांना तक्रार केल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपच्या पराभवानंतर विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागले. ते नाव न घेता म्हणाले, “आमची मानसिकता रन बनवण्याची आणि धावा करण्याचा प्रयत्न करण्याची असली पाहिजे. आऊट होण्याबाबत जास्त काळजी करू शकत नाही. असे केल्याने तुम्ही गोलंदाजांना वर्चस्व मिळवू देता.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय टीमला पराभव स्विकारावा लागला. अंतिम सामन्यात भारतीय टीम 170 धावांत कोलमडली होती. यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब फॉर्ममुळे चर्चेत असलेल्या पुजारा आणि रहाणे यांना बोलावून घेत कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये दोघांनाही सुनावलं. ज्यामुळे नंतर मोठा वाद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, “विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याबाबत चर्चा केल्यानंतर रहाणे-पुजारा यांनी जय शाह यांना फोन केला होता. यानंतर बीसीसीआयने तात्काळ कारवाई केली. वरिष्ठ क्रिकेटपटूंच्या फोननंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंचे अभिप्राय घेतले. इंग्लंड दौरा संपल्यानंतर बीसीसीआय यावर निर्णय घेईल असं सांगितलं होतं."


इंग्लंड दौरा संपल्यानंतर लगेचच खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी यूएईमध्ये आले. त्यानंतर ही बातमी देखील आली की भारतीय कर्णधार विराट कोहली टी -20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडत आहे. टी-20 चे कर्णधारपद सोडणं हे विराटच्या टीम मीटिंगमधील चर्चेशी जोडलं जातंय.