हा WWE चॅम्पियन ठरला होता कॅन्सरचा शिकार
`पोरस` नावाची सीरीज छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चेत आहे. इंटरनॅशनल रेस्लर आणि बॉडी बिल्डर ऐरन डब्ल्यू यामध्ये दिसणार आहे.
नवी दिल्ली : 'पोरस' नावाची सीरीज छोट्या पडद्यावर चांगलीच चर्चेत आहे. इंटरनॅशनल रेस्लर आणि बॉडी बिल्डर ऐरन डब्ल्यू यामध्ये दिसणार आहे.
या शोमध्ये तो पारसी योद्ध्याची भूमिका साकारत आहे.
७ वेळा बॉडी बिल्डींग चॅम्पियन
ऐरन हा माजी WWE चॅम्पिअन आणि जगातील सर्वात मोठ्या उंचीचा बॉडी बिल्डर आहे. तो सध्या या शो साठी भारतात आलाय.
उमरगावमध्ये शोचा सेट असलेल्या ठिकाणी राहतो. 'द सुपरनेचुरल लाइफस्टाइल' नावे त्याने पुस्तकही लिहिले आहे. तो ७ वेळा बॉडी बिल्डींग चॅम्पियन राहिला आहे.
७ वर्षापर्यंत केमोथेरेपी
तो ४ वर्षाचा असताना त्या ल्यूकेमिया आजार असल्याचे निदान झाले होते. ७ वर्षापर्यंत त्याला केमोथेरेपी करावी लागत असे.
पण त्याने हार मानली नाही. आपली लाईफस्टाईल आणि मेहनतीने त्याने सर्व आजारांवर मात केली.
हिंदी भाषा शिकतोय
ऐरनची उंची ६.७ फूट आहे. तो सेटवर खूप चांगला वेळ घालवत आहे. सहकाऱ्यांकडून हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्नही करत आहे. त्याच्या डाएटची काळजी घेतली जात आहे.
डायलॉग डब करणार
त्याच्यासाठी पोषक आहार आणि जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. एका कार्यक्रमासाठी काही दिवसांपूर्वी तो मुंबईत आला होता.
त्यावेळी सिरीअलच्या निर्मात्यांसोबत त्याची भेट झाली. तो या कॅरेक्टरसाठी एकदम फिट असून त्याचे डायलॉग्ज डब केले जाणार आहेत.