India vs South Africa Playing 11: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज बरोबरीत सुटली असून आजपासून वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली वनडे सामन्यांसाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी तीन सामन्यांच्या या वनडे सिरीजमधील पहिला सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण प्रयत्न करणार असून आजच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे आपण पाहूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे सिरीज 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्गच्या वांडरर्स क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली ही टीम टी-20 पेक्षा वेगळा असणार आहे. यामध्ये साई सुदर्शन, रजत पाटीदार असे नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना वनडे साठी संधी देण्यात आलेली नाही.


रिंकू सिंह वनडे मध्ये करणार डेब्यू?


इंडियन प्रिमीयर लीग आणि T20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला यावेळी वनडेमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळू शकते. रिंकूने T20 सिरीजमध्ये शानदार फलंदाजी केली. याशिवाय त्याने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावलं. टीममध्ये असे काही चेहरे आहेत बऱ्याच काळानंतर कमबॅक करणार आहेत. 


गोलंदाजीमध्ये जाणवू शकते अनुभवाची कमी


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजीत अनुभवाची कमतरता आहे. यावेळी गोलंदाजीमध्ये टीमला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांच्यावर असणार आहे. वनडे सिरीजमध्ये रवींद्र जडेजा संघाचा भाग नाही, त्यामुळे अक्षर पटेलचे स्थान निश्चित मानलंय. तर यावेळी कुलदीपच्या जागी युझवेंद्र चहलला संधी मिळण्याची शक्यता आहे.


कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11


केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, अवेश खान, अर्शदीप सिंह


कशी असणारे दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11


एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिज़ाद विलियम्स