IND vs WI TIlak Verma Celebration Viral Video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात (IND vs WI 2nd T20I) टीम इंडियाला दारूण पराभव झाला. दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजने 2 गडी राखून भारताला पाणी पाजलं. त्यामुळे आता कॅरेबियन संघाने 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. भारताचे सर्व फलंदाज स्पशेल फेल ठरले. तिलक वर्मा (Tilak Varma) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तिलक वर्माने दमदार अर्धशतक ठोकत वर्ल्ड कपचे दार ठोठावले आहेत. अशातच आता तिलक वर्माचा एक व्हिडीओ (Tilak Varma Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या सामन्यात तिलक वर्माने (Tilak Varma) दमदार अर्धशतक ठोकलं आहे. 39 बॉलमध्ये पाच फोर आणि एका खणखणीत सिक्सच्या मदतीने त्यांने अर्धशतक साजरं केलं. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तिलक वर्माने अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन केलं. खणखणीत फिफ्टी मारल्यानंतर लहान मुलांसारखं नाचताना (Tilak Varma Celebration) दिसला. तिलकने असं का केलं? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर आता तिलक वर्माने उत्तर दिलंय.



काय म्हणाला तिलक वर्मा?


सेलिब्रेशनचे कारण रोहित शर्माची मुलगी समायरा (Samaira) आहे. टिलक पुढे म्हणाले की, आमचे संबंध खूप चांगले आहेत. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक किंवा अर्धशतक झळकावतो तेव्हा मी शतक खास पद्धतीने साजरं करेन. मी तिला म्हटलं होतं आणि मी हे फक्त सॅमीसाठी (Sammy) साजरे केलं होतं, असं तिलक वर्मा म्हणतो.


रोहित भाई मला नेहमी मदत करतो. आजच्या खेळीनंतर माझी त्यांच्याशी बोलणं होईल. माझ्यासाठी तो सपोर्ट सिस्टीम सारखा आहे. त्याने मला सांगितलं होतं, तू फक्त क्रिकेट एन्जॉय कर. त्यानंतर मी मोकळेपणाने फलंदाजी करतोय, असंही तिलक वर्मा म्हणतो.



आणखी वाचा - World Cup 2023: इथं 9 खेळाडूंचा पत्ता नाही अन् रोहित सोडतोय तोंडच्या वाफा; भविष्यवाणी करत म्हणतो...


दरम्यान, तिलक वर्मा सध्याच्या टी-ट्वेंटी संघात 4 थ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. त्यामुळे आता तिलक वर्मा याला आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर 4 थ्या क्रमांकासाठी ट्राय केलं जातंय का? असा सवाल उपस्थित होत आहे. युवराज सिंह याच्यानंतर अजून एकही खेळाडू या स्थानावर टीकला नाही. ऋषभ पंत जायबंदी उठली नसेल तर तिलक वर्मा लेफ्ट हॅड फलंदाज मैदानात उतरू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता तिलक वर्माकडे मोठ्या आशेने पाहिलं जातंय.