Tilak Varma, IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज (India West Indies T20) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी खिश्यात घातल्याने आता कॅरेबियन खेळाडूंनी पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्यात 150 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचे (Team India) खेळाडू पत्त्यासारखे कोसळले. मात्र, या सामन्याच चमकला तो रोहित शर्माच्या तालमीत तयार झालेला तिलक वर्मा (Tilak Varma).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 8 वर्षात आत्तापर्यंत क्रमांक 4 चा खेळाडू मिळाला नाही. त्यामुळे आता युवराजची जागा भरून काढणारा खेळाडू म्हणून तिलक वर्मा (Tilak Varma) याचं नाव घेतलं जातंय. युवराज सारख्या आक्रमक अंदाजात तिलक वर्माने डेब्यू केला. पहिल्या दोन बॉलवर दोन सिक्स खेचत वर्माने आपल्या आगमनाचे संकेत दिले आहेत. अशातच पहिल्या सामन्यानंतर तिलक वर्माने आई वडील भावूक झाल्याचं पहायला मिळालं. 


नेमकं काय म्हणाला Tilak Varma?


संघात संधी मिळाल्यानंतर ईशान किशन (Ishan Kishan) तिलक वर्माची मुलाखत घेतली. त्यावेळी अनुभवाविषयी विचारल्यावर तिलकने भावना व्यक्त केल्या. निवड झाल्यानंतर तुझ्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती आणि तुला कसं वाटलं? असा सवाल ईशानने केला. त्यावर तिलक वर्माने आई वडिलांना फोन केला. डेब्यूबाबत फोनवर ऐकताच आई-वडील रडू लागले, असं तिलक वर्मा म्हणाला.


डेब्यूविषयी ऐकल्यानंतर मला घरच्यांसोबत जास्त बोलू वाटत होतं. त्यावेळी रात्रीच्या 11 वाजल्या होत्या. मी घरच्यांशी आणखी बोलत राहिलो असतो, तर ते आणखी रडले असते. त्यामुळे वेळेचं भान ठेऊन फोन कट केला, असं तिलक वर्मा म्हणतो. भारताकडून खेळण्याचं स्वप्न तर प्रत्येकाचं असतं, मी मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी खेळायचंय, असा कधी विचार केला नव्हता, असा खुलासा देखील तिलक वर्माने केला आहे.


आणखी वाचा - Tilak Varma: डेब्यू सामन्यात तिलक वर्माने रचला इतिहास; मिळवली राहुल द्रविडच्या क्लबमध्ये एन्ट्री!


डेब्यूनंतर तू अचानक इतका कसा बदलला? तुझ्या पूर्ण हातावर, छातीवर, पायावर प्रत्येक ठिकाणी टॅटू आहे, असं म्हणत ईशान किशनने तिलक वर्माने पाय खेचण्याचा प्रयत्न केला. मला लहानपणापासून टॅटू काढायचा होता. मी कोचला विचारलं, तेव्हा त्यांनी नकार दिला होता. त्यांनी मला कधी टॅटू काढून दिला नाही. त्यामुळे आता मी टॅटू काढू शकतो, असं वर्माने म्हटलं आहे.


पाहा Video



दरम्यान गेल्या सामन्यात, तिलक वर्माने 22 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. 177 च्या स्टाईक रेटने वर्माने धावा चोपल्या. डेब्यु सामन्यात 170 पेक्षा अधिकच्या स्टाईक रेटने तिलक वर्माने वादळ उठवलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.