Tim Southee Hat-Trick : भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडचा डाव 18.5 षटकांत 126 धावांवर आटोपला होता. जरी काल (21 नोव्हेंबर) न्यूझीलंडचा पराभव झाला असला तरी टीम साउदीने हॅट्रीक घेत एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात रिषभने ( 6) फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु फर्ग्युसनच्या पहिल्याच चेंडूवर तो  झेलबाद झाला. टीम साऊदीने अप्रतिम रिटर्न कॅच घेताना भारताला 36 धावांवर पहिला धक्का दिला. मात्र याचदरम्यान 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या, चौथ्या चेंडूवर दीपक हुडा आणि पाचव्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला बाद करत साऊथीने हॅट्ट्रिक पूर्ण केली. साऊदीची टी-20 आंतरराष्ट्रीय मधील ही दुसरी हॅट्ट्रिक आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याच्या बाबतीत तो संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. साऊदीने याआधी 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिली हॅटट्रिक घेतली होती. 


वाचा : याआधी कधीही सुर्यकुमारने कॅमेरासमोर जे केलं नाही ते कृत्य केलं! 


 न्यूझीलंडचा संघ 126 धावांत सर्वबाद झाला. केवळ कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) 61 धावांची एकहाती झुंज दिली. पण दीपक हुडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्यामुळे 18.5 षटकांत न्यूझीलंडचा संघ (New Zealand) 126 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने 65 धावांनी जिंकला.   साऊथीने या बाबतीत श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची (lasith Malinga) बरोबरी केली आहे. मलिंगाने देखील या फॉरमॅटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत साऊदी पहिल्या स्थानावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 132 विकेट्स घेतल्या आहेत.