कोलंबो : भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश या टीममध्ये टी-20 ट्रायसीरिज होणार आहे. भारत हा पहिल्यांदाच टी-20 ट्रायसीरिज खेळणार आहे. ६ मार्चपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. तर या सीरिजचा शेवटचा सामना १८ मार्चला होणार आहे. या सीरिजमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध दोनवेळा खेळेल. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात जास्त पॉईंट्स असलेल्या २ टीम १८ मार्चला फायनल खेळतील. या सगळ्या मॅच संध्याकाळी ७ वाजता सुरु होतील.


टी-20 ट्रायसीरिजचं वेळापत्रक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका


८ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश


१० मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश


१२ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका


१४ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश


१६ मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश


१८ मार्च- फायनल


अशी आहे भारतीय टीम


रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, के.एल.राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्सर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रिशभ पंत(विकेट कीपर)