मुंबई : पहिल्या टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा इनिंग आणि २७२ रननी पराभव केला. भारताचा घरच्या मैदानातला हा १०० वा विजय आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजनं त्यांच्या २० पैकी १४ विकेट गमावल्या. रनच्या हिशोबानं भारताचा हा दुसरा सगळ्यात मोठा विजय आहे. या मॅचमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्याच मॅचमध्ये शतक करण्याचा रेकॉर्ड पृथ्वी शॉनं केला. पृथ्वी शॉ बरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजानंही शतक केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाल्यानंतर भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं खोचक ट्विट केलं. या ट्विटमध्ये हरभजननं वेस्ट इंडिजच्या टीमवर निशाणा साधला. वेस्ट इंडिजच्या टीमचा मान ठेवून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे? सध्याची वेस्ट इंडिजची टीम रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्लेट ग्रुपमधून तरी क्वालिफाय होईल का? एलिट ग्रुपमधून तर होणारच नाही, असं ट्विट हरभजननं केलं. 



हरभजनच्या या ट्विटला वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर टिनू बेस्टनं प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्लंडविरुद्ध अशी खोचक ट्विट पाहिली नाहीत. पण हे युवा खेळाडू शिकतील, असं ट्विट टीनू बेस्टनं केलं आहे.