मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारतीय मेन्स हॉकी टीमने (India Mens Hockey Team)  41 वर्षांनी ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय हॉकी टीमने रंगतदार झालेल्या सामन्यात जर्मनीचा 5-4 ने पराभव केला. यासह ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. याआधी टीम इंडियाने हॉकीमध्ये 1980 मध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर देशाच्या कानाकोपऱ्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) चाहते माजी सलामीवीर गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) चांगलेच संतापले आहेत. चाहते नक्की का संतापले, हे जाणून घेऊयात. (tokyo olympics 2020 india mens hockey team victory in Olympics is bigger than World Cup says former opener gautam gambhir)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉकी टीमच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर अनेकांनी ट्विटद्वारे कौतुक केलं. यामध्ये गौतम गंभीरही  (Gautam Gambhir) मागे राहिला नाही. हॉकी टीमने पटकावलेलं पदक हे वर्ल्ड कपपेक्षा कमी नसल्याचं गंभीरने नमूद केलं. गंभीर ट्विट करत म्हणाला की, "1983, 2007 किंवा  2011 असो,  हॉकी टीमने कमावलेलं हे पदक वर्ल्ड कपपेक्षा कमी नाही." गंभीरने टीम इंडियाला 2007 आणि 2011चं वर्ल्ड कप जिंकवण्यात निर्णायक कामगिरी केली होती. मात्र गंभीरला त्याचं श्रेय मिळालं नाही, असं क्रिकेट वर्तुळात म्हटलं जातं.



गंभीरने ट्विटमधून हॉकी टीम इंडियाला शुभेच्छा देत धोनीवर टीका करण्याचा प्रयत्न केला. हा डाव नेटकऱ्यांनी ओळखला. यावरुन आता गंभीरवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान गंभीरने धोनीवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा गंभीरने वेळोवेळी धोनीवर हल्ला चढवला आहे. 



भारताला हॉकीत 41 वर्षांनी मेडल


दरम्यान भारतीय हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांनी मेडल जिंकलं आहे. याआधी भारताने वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वात 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये  सुवर्ण कमाई केली होती. त्यानंतर मात्र भारताला पदकासाठी वाटच पाहावी लागली. हॉकी टीम इंडियाला 1984 च्या लॉस एंजिलेस ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आता भारताने पुन्हा 41 वर्षाने ऐतिहासिक कामगिरी केल्याने खेळाडूंचं कौतुक केलं जातंय.