टोकिओ : सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी महिला दुहेरी स्पर्धेत पराभूत झाली आहे. पहिल्या फेरीत युक्रेनच्या जुळ्या बहिणी लिडमयला आणि नादिया किचनोक यांच्याकडून 6-0,6-7,8-10 पराभव स्विकारावा लागला. खरेतर सानिया आणि अंकिताच्या जोडीला स्पर्धा जिंकन्याची सुवर्णसंधी होती. परंतु तिसऱ्या फेरीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. सानिया आणि अंकिताच्या पराभवानंतर टोकिओ ऑलंपिकच्या टेनिस स्पर्धेमध्ये सुमित नागलच्या रुपात एकमेव आशा उरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या सेटमध्ये सानिया - अंकिता प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णतः वरचढ ठरल्या. परंतु दुसऱ्या सेटमध्ये कचनोक बहिणींनी स्पर्धेत बरोबरी केली. त्यानंतरच्या टायब्रेकरमध्ये सानिया-अंकिता एकही पॉइंट जिंकू शकल्या नाही. आणि युक्रेनी जोडीने सलग 7 पॉइंट जिंकून सेट आपल्या नावावर केला.



त्यानंतर डायरेक्ट टायब्रेकरमध्ये किचनोक बहिणींनी 8-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा भारतीय जोडीने सलग 7 पॉइंट जिंकून स्कोर 8-7 केला. परंतु युक्रेनी जोडीने निर्णायक दोन महत्वपूर्ण पॉइंट घेऊन सामना जिंकला.