चेन्नई : गुरुवारी चेन्नई येथे जाहीर झालेल्या खेळाडूंच्या लिलावात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या मोसमासाठी अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमला चेन्नई सुपर किंग्जने 9.25 कोटी रुपयांची जोरदार बोली लावली गेली. कृष्णप्पाची बेस किंमत 20 लाख रुपये होती तर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने देखील त्याला खरेदी करण्यासाठी बोली लावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताने कृष्णाप्पासाठी एक कोटीपर्यंत बोलली लावली. पण हैदराबादने त्या सर्वांपेक्षा पुढे जाऊन कृष्णाप्पासाठी पाच कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर चेन्नई सुपर किंग्जनेही बोलीमध्ये उडी मारली आणि अष्टपैलू कृष्णाप्पाला 9.25 कोटी रुपयांच्या जोरदार बोलीसह खरेदी केले.



ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तो 16 कोटी 25 लाखांना विकला गेला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. मॉरिसने युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे. युवराजला याआधी 16 कोटींना खरेदी केले गेले होते.


ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू Jhye Richardson ला  Punjab Kings ने 14 कोटींना खरेदी केले. त्याची बेस प्राईस 1.50 कोटी होती. 


ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसाठी विक्रमी बोली लावली जात आहे. आरसीबीने बाजी मारली. फ्रँचायझीने त्याला 14.25 कोटीमध्ये खरेदी केले आहे. मॅक्सवेलला विकत घेण्यासाठी आरसीबी आणि सीएसकेमध्ये चढाओढ झाली.


Kyle Jamieson ला Royal Challengers Bangalore ने तब्बल 15 कोटींना खरेदी केले.