मुंबई : क्रीडा जगताला हादरवणारी बातमी सध्या समोर आली आहे. जिथं एका लोकप्रिय खेळाडूला धमकावण्याची घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या लोकप्रिय फुटबॉल खेळाडूचे एका (Transgender) ट्रांसजेंडरसोबत शारीरिक सबंध होते. मिळालेल्या अहवालानुसार मागील वर्षी जुन महिन्यात फुटबॉलरने पोलिसात तक्रार केली होती. तक्रारीच्या आधारे एका ट्रांसजेंडर एस्कॉर्टला ब्लॅकमेल केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. 


इंग्लंडच्या  एका लोकप्रिय फुटबॉलरचे ट्रांसजेंडर एस्कॉर्टसोबत शारीरिक सबंध होते या माहितीनेच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्यामध्ये अनेकदा भेटी झाल्या, नंतर हे भेटीचे सत्र असेच सुरु राहिले. 


फुटबॉलरला वाटले की, त्या दोघांमध्ये होणाऱ्या भेटी गुप्त राहतील, पण असे झाले नाही. त्या महिलेने लपून-छपून त्यांच्या भेटीचे व्हिडीओ काढले. तिने यावरच न थांबता तिच्या घराबाहेर त्याचा फोटोसुद्धा काढला.


फुटबॉलरने केलेल्या तक्रारीनुसार त्या महिलेने (Transgender) ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची त्याला धमकी दिली. त्याच्या मोबदल्यात तिने तीस हजार पाउंडची  (जवळपास 28 लाख 48 हजार रुपये) मागणी केली होती. तो ब्लॅकमेलिंगचा शिकार झाला अशी तक्रार त्याने पोलिसांना केल्याचे समोर आले आहे.


प्रिमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या या फुटबॉलरने एका एस्कॉर्टींग वेबसाईटवर या महिलेची प्रोफाईल बघितली. त्यानंतर फुटबॉलरने ट्रांसजेंडर महिलेसोबत संपर्क केला. मिळालेल्या माहितीनुसार असे समोर आले की, दोघांच्या भेटी अनेकदा सिटी सेंटर येथिल फ्लॅटवर व्हायच्या. एप्रिल 2021 मध्ये त्या महिलेसोबत शारीरिक सबंध ठेवण्यासाठी त्याने 150 पाउंड इतकी रक्कमही मोजली होती.


फुटबॉलरने त्याच्या क्लबला या घटनेबद्दल माहिती दिली. या घटनेचा त्याच्या खेळावरही परिणाम झाला. या घटनेबाबत ट्रांसजेंडर एस्कॉर्टची विचारपूस करण्यात आली. पुढे फुटबॉलरचा जबाब नोंदवण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यानं याबाबत बोलण्यास नकार दिला. ज्यामुळे सदर प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला.