मुंबई : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणतात. तोच अनुभव एक क्रिकेटरने घेतला. विमान अपघातात क्रिकेटर आणि त्याची गर्भवती सापडले. मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघांचाही जीव वाचला. त्याने याचा थरारक अनुभव सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटर आणि होणाऱ्या पत्नीचा जीव वाचला आहे. होणारी पत्नी गर्भवती आहे. मालदीववरून एका विमानाने ते घरी जात असताना ही दुर्घटना घडली. 


ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड आणि त्याची होणारी पत्नी जेसिका डेविससोबत हा अपघात झाला. जेसिका 6 महिन्यांची गर्भवती आहे. त्यांनी याची माहिती इन्स्टाग्रामवर दिली. विमानात काहीतरी बिघाड झाल्याने तातडीनं विमान लँड करण्यात आलं. घर 45 मिनिटं दूर होतं. लाँडिंगवेळी विमान घसरलं आणि मैदानात गेलं. 


हा अनुभव आमच्यासाठी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हता. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. स्टाफने प्रवाशांना एक खोलीत बंद केलं. त्या खोलीत मोबाईल सिग्नल नव्हता ना पाण्याची सुविधा होती. त्यामुळे प्रवासी स्टाफवर खूप संतापले होते. 



45 मिनिटं एका बंद खोलीत प्रवाशांना ठेवल्याने सगळेजण घाबरले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी 45 मिनिटांनी दरवाजा उघडला आणि चांगल्या ठिकाणी घेऊन गेले. या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जवळपास 4 तास गेले. 


ट्रॅविस हेडने 2016 पासून ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 45 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्येही बंगळुरू टीमकडून खेळला आहे. त्याने 10 सामन्यात 205 धावा केल्या. ट्रॅविसने या वर्षाच्या सुरुवातीलाच होणारी पत्नी गर्भवती असल्याची घोषणा केली.