IRFAN PATHAN COBRA FILM: अनेक खेळाडू हे चित्रपटात आपलं भविष्य आजमवतात. असाच एक भारतीय क्रिकटपटूचा लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटच्या इनिंगनंतर आता तो इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. क्रिकेटचा महान अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण तमिळ थ्रिलर 'कोब्रा' मधून प्रेक्षकांना भेटणार आहे. या चित्रपटात चियान विक्रम मुख्य भूमिकेत आहे.चित्रपटाचा ट्रेलर 25 ऑगस्टला लाँच करण्यात आला आणि 48 तासांपेक्षा कमी कालावधीत या ट्रेलरला यूट्यूबवर 8.4 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (treading news irfan pathan new role trailer of cobra and know release date entertainment news)


रैनानेदेखील चित्रपट पाहण्यास उत्सुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटपटू सुरेश रैनाने ट्विटरवर कोब्राचा ट्रेलर शेअर केला आहे. रैनाने लिहिले आहे की, ''तुला भाऊ इरफान पठाण कोब्रामध्ये परफॉर्म करताना पाहून खूप आनंद झाला. हा पूर्णपणे अॅक्शन packed चित्रपटासारखा दिसतो, तुम्हाला आणि संपूर्ण कलाकारांना या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. तो पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही."


कधी रिलीज होणार चित्रपट?


अजय ग्यानमुथू दिग्दर्शित 'कोब्रा' हा एक अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे जो विक्रमला सुमारे 20 वेगवेगळ्या अवतारांमध्ये दाखवतो. कलाकारांमध्ये KGF अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, मिया जॉर्ज, रोशन मॅथ्यू, सरजानो खालिद आणि मिरनालिनी रवी यांचा समावेश आहे. भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाण 'कोब्रा'मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.  



ट्रेलरमध्ये इरफान अतिशय शानदार लूकमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये इरफानची एन्ट्री अप्रतिम आहे. या चित्रपटाचे शूटिंग 90 कोटींच्या बजेटमध्ये झाल्याचं बोललं जातं आहे. कोब्रा 31 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.