ICC Men’s Emerging Cricketer : भारतीय संघाचा युवा खेळाडू अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) कमी काळात संघाचा स्ट्राईक गोलंदाज बनला आहे. यॉर्कर किंग बूमssबूम बुमराहच्या जागी संधी मिळालेल्या पठ्ठ्याने आपल्या चमकदार कामगिरीने नाव कमावलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T-20 World Cup 2022) भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या होत्या. 23 वर्षाच्या तरूण पोराची थेट आयसीसीने दखल घेतली आहे. आयसीसीने यंदाच्या आयसीसी इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर (ICC Mens Emerging Cricketer of the year) या पुरस्कारासाठी अर्शदीपला नामांकन मिळालं आहे. (Trending ICC Men’s Emerging Cricketer indian player arshdeep singh latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने चार गोलंदाजांटी निवड केली असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन, अफगाणिस्तानचा इब्राहिम जारदान, न्यूझीलंडचा फिन अलन आणि भारताचा अर्शदीप सिंह यांची निवड केली आहे. या पुरस्कारांसाठी जानेवारीपासून मतदान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याला या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. 


आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये अर्शदीपने कॅच सोडल्यावर खलिस्तानी म्हणून त्याच्यावर टीका झाली. मात्र त्याने  हार मानली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात अर्शदीपने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना बाद करत  मोठं यश मिळवलं होतं. सामन्यामध्ये 32 धावा देत त्याने 3 बळी घेतले होते. 


 



दरम्यान, अर्शदीपने भारताकडून 21 टी-20 सामन्यांमध्ये 33 बळी घेतले आहेत. अर्शदीपची खास गोष्ट म्हणडे संयम ठेवत फलंदाजाला मोठा फटका मारण्यापासून कसं रोखता येईल यासाठी तो अचूक लेंथवर गोलंदाजी करतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे नव्या आणि जुन्या दोन्ही चेंडूवर त्याने विकेट्स घेतल्या आहेत. आगामी वर्ल्ड कपसाठी भारताकडून त्याला संधी मिळाली तर नक्कीच संघाला फायदा करून देईल.