Pakistan, T20 World Cup : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मधील अखेरचे सामने खेळले जात आहे. आज सुपर 12 सामन्यांचा शेवट झाला. त्यानंतर आता सेमीफायनलिस्टची नावं समोर आली आहेत. पहिला सेमीफायनल (1st Semi-Final) सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांत्यात खेळला जाणार आहे. तर दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल (2nd Semi-Final) सामना होणार आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या लढती आणखी रंगतदार झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेदरलँड आणि साऊथ अफ्रिका (South Africa vs Netherlands) यांच्यात झालेल्या सामन्यात नेदरलँडने थरारक विजय मिळवला. त्यामुळे दुसऱ्या गटातील समीकरणं बदलली. पाकिस्तानने बांग्लादेशला पराभव केला सेमीफायनलचं तिकीट खिश्यात घातलं. मात्र, काहीही म्हटलं तरी पाकिस्तान सेमीफायनलला आली ती नेदरलँडच्या जीवावर...


आणखी वाचा- VIDEO: सिक्युरिटी तोडून 'तो' मैदानात घुसला, पाहा IND vs ZIM मॅचमध्ये नेमकं काय घडलं?


सेमीफायनलला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये (Dressing room of Pakistan) उत्साहाचं वातावरण दिसतंय. ड्रेसिंग रूममध्ये कॅप्टन बाबरने खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतोय. मागच्या दोन सामन्यात आपण जसं खेळलोय. आपल्याला आताही असंच खेळाचंय. ज्याला जी जबाबदारी देण्यात आली आहे, ती त्याने पुर्ण करायची आहे. आपण सामना जिंकायचा पुर्ण प्रयत्न केलाय, असंही बाबर आझम (Babar Azam) म्हणताना दिसतोय.


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, छोट्या छोट्या गोष्टीवर काम केलं तर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. बॉलिंग चांगली झाली. आता आणखी काही गोष्टींवर काम करण्याची गरज आहे, असंही बाबर यामध्ये म्हणताना दिसतोय. पाकिस्तान आगामी सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडशी (NZ vs PAK) असणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तान फायनलला पोहोचणार की बाहेर पडणार? असा सवाल उपस्थित केला जातोय.