Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Trending Viral Video : सोशल मीडियावर (Social media) कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. क्रिकेटच्या (Cricket Video) मैदानातून नेहमीच मनोरंजक व्हिडिओ समोर येत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरदेखील (Sachin Tendulkar) हा व्हिडीओ पाहून अवाक् झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये (Trending Video) आहे.
क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलपटू
आजकाल अनेक ठिकाणी शहरांमध्ये असो गावांमध्ये क्रिकेट लीगचं आयोजन केलं जातं. अशाच एका गावातील क्रिकेट लीगमधील एक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बँटमने बॉल मारल्यानंतर तो एका फिल्डरने बॉर्डरवर उडी मारुन पकडला..पण त्याचा तोल गेला आणि तो बॉर्डरबाहेर पडणार म्हणून त्याने बॉल हवेत फेकला. कारण नाही तर तो सिक्सर झाला असतो. पण बॉल हवेत फेकल्यानंतरही तो सीमेरेषापलीकडे गेला म्हणून त्याने पुढच्या क्षणाला पायाने बॉल मारला आणि तो मैदानाच्या आत पडला. (Trending Video cricketer became footballer Ronaldo video Retweet on Twitter by sachin tendulkar video viral on Social media )
त्या फिल्डरची कमाल पाहून नेटकऱ्यांनी त्याला रोनाल्डो म्हटलं आहे. क्रिकेटच्या मैदानात अचाकन फुटबॉलपटू दिसल्याचं अनेक जण म्हणतं आहे. या फिल्डरची ही फिल्डिंग पाहून सचिन तेंडुलकरही आश्चर्यचकित झाला आहे. सचिन तेंडुलकरने हा व्हिडिओ ट्विटरवर रिट्विट केला आहे. यावेळी त्याने लिहिले की, ''अशी व्यक्ती जेव्हा क्रिकेट खेळते तेव्हा असे होते, ज्याला फुटबॉल कसा खेळायचा हे देखील माहित आहे.''
हा व्हिडिओ कर्नाटकातील बेळगाव येथील स्थानिक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यातील आहे. यामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने सर्वांची मने जिंकली.