मुंबई : भारतीय टीम सध्या चांगली फॉर्मात दिसते आहे. कसोटी, वनडे दोन्हीकडे टॉप ३ मध्ये आहे. टीमचे बॅट्समन्सही चांगला खेळ करत आहेत. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मालिकेलाही सुरुवात होणार आहे. 
  
दरम्यान भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंडचा बॉलर ट्रेंट बोल्टचे आव्हान असल्याचे सांगितले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना रोहित म्हणाला,
‘ट्रेण्ट बोल्ट हा जगातील सर्वाधिक धोकादायक डावखुऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळून काढणे आमच्यासाठी एक मोठे आव्हान असणार आहे.


‘आम्ही यापूर्वी न्यूझीलंडशी खेळल्याने त्यांच्या क्षमतेची आम्हाला जाणीव आहे. गोलंदाजीमध्ये ते काय करू शकतात याचाही अंदाज असल्याचे त्याने सांगितले. 
न्यूझीलंडचा सांघिक खेळ चांगला असल्याने आम्हाला केवळ बोल्टवर लक्ष केंद्रीत न करता इतर खेळांडूच्या खेळाप्रमाणे योजना आखाव्या लागतील,’ असे रोहित यावेळी म्हणाला.