ओव्हल : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात आफ्रिकेविरुद्ध भारताचे पारडे जड राहिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण सामन्यात आफ्रिकेकडून अनेक चुका झाल्या. अशीच एक हास्यास्पद चूक डेविड मिलर आणि फाफ डू प्लेसिस हे दोघे खेळत असताना घडली.


अश्विनच्या शॉटवर डू प्लेसिसने शॉट मारला आणि दुसऱ्या बाजूने मिलर धाव घेण्यासाठी धावला. मात्र प्लेसिस आणि मिलर यांच्या समन्वयाचा गोंधळ उडाल्याने दोघेही एकाच क्रीजवर धावले. दुसरीकडे विराटने स्टंपला बॉल लावला आणि मिलर बाद झाला.  


मिलरच्या या बाद होण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. अनेकांनी तर महेंद्र बाहुबलीसमोर द. आफ्रिका नतमस्तक झालीये असेही ट्विटरवर म्हटलेय.