मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : महाराष्ट्रच्या दोन सायकलपट्टूने अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका जिंकून इतिहास बनविला आहे.  नाशिकचे सायकलिस्ट गोकुलनाथ श्रीनिवास आणि नागपूरचे सायकलिस्ट अमित समर्थ यांनी अनुक्रमे सातवे आणि आठवे पटकावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका खंडाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोका पर्यंतचा खडतर प्रवास असणारी रँम स्पर्धा पूर्ण करून  पुन्हा एकदा नाशिकच्या स्पर्धकाने  अमेरिकेत तिरंगा फडकवलाय.  लेफ्टनंट कर्नल डॉ गोकुलनाथ श्रीनिवास यांनी व्यक्तिगत गटातून तीन हजार मैलाची स्पर्धा अवघ्या ११ दिवस ११ तासात पूर्ण केलीय. सोलो प्रकरात स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरलेय..


अमित समर्थ यांनी ५ हजार किमीची ही रेस ११ दिवस २१ तास आणि ११ मिनिटात पूर्ण केली आहे.  श्रीनिवास यांचा हा दुसरा प्रयत्न होता, पण अमितने पहिल्याच प्रयत्नात रेस पूर्ण केले. 
 
विश्वातील सर्वात खडतर  सायकल स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे बघितले जाते ती अमेरिका खंडातील रॅम स्पर्धा होय. अमेरिकेच्या एका टोका पासून दुसर्या टोका पर्यंत तब्बल बारा राज्यांचा प्रवास पूर्ण करता करता स्पर्धकाचा अक्षरशः कस लागतो.  


कधी वाळवंटी प्रदेश, कधी कडाक्याची थंडी, कधी जोरदार वाऱ्यासह पावसाचा सामना तर कधी तब्बल एक लाख ७० हजार फुटांची चढाई. कधी ४५ अंश सेल्सियस मधून प्रवास तर कधी ४-५ अंशां पर्यंत घसरलेल तपमान अशा नैसर्गिक आव्हानाचा सामना स्पर्धेत करावा लागतो. म्हणूनच जगाचं पाठीवर या स्पर्धेला अत्यंत खडतर आणि महत्वाची स्पर्धा मानली जाते  हीच स्पर्धा नाशिकच्या आर्टिलरी  सेंटरमध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर  कार्यरत असणाऱ्या डॉ.  गोकुलनाथ श्रीनिवास यांनी पार केलीय. 


व्यक्तिगत गटात स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरलेत. दोन वर्षापूर्वी नाशिकच्या महाजन बंधूनी ही स्पर्धा पूर्ण करून इतिहास घडविला होता. आता श्रीनिवास यांनीही विजयी झेंडा रोवलाय. त्यांच्या बरोबरच महराष्ट्रातील आणखी एका चमूनेही स्पर्धा पूर्ण करून नाशिक आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे त्यामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात  आनंदाचे वातवरण आहे.


 



सायकल आणि नाशिककरांचे अतूट नाते निर्माण झालेय.  श्रीनिवास यांच्या रूपाने याह्या नात्याची मोहर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटली आहे. याचा  जेवढा नाशिककरांना अभिमान आहे  तेढीच मिलिटरीसाठीही  गौरवास्पद बाब आहे त्यामुळे निवृत्त अधिकारी श्रीनिवास यांच्या कामगिरीचे कौतुक करतायेत.  श्रीनिवास यांची मेहनत सराव, मनाचा निश्चय मिलिटरी मध्ये जे प्रशिक्षण दिले जाते त्या जोरावर हि स्पर्धेत यश मिळविल्याचे अधिकारी सांगतात


जगाच्या पाठींवर उद्योग क्षेत्र असो, कला क्षेत्र असो किवा क्रीडा क्षेत्र भारतीय कुठेच मागे नाही हे नाशिकच्या विक्रमवीरांनी दाखवून दिलेय. येत्या दोन दिवट ते मायदेशी परतणार असल्याने त्यांच्या जंगी स्वगताची तयारी केली जातेय. हेतू केवळ इतकाच त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन घराघरात असे विक्रम वीर तयार  झाले पाहिजे