क्वीन्सटाऊन : भारताच्या अंडर १९ क्रिकेट टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं खेळाडूंना खडसावलं आहे. आयपीएलच्या लिलावावर लक्ष देण्यापेक्षा अंडर १९ वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत करा, असा सज्जड दम राहुल द्रविडनं खेळाडूंना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीनवेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताचा सामना शुक्रवारी बांग्लादेशबरोबर होणार आहे. अंडर १९ वर्ल्ड कप खेळणाऱ्या कॅप्टन पृथ्वी शॉ, शुममान गिल, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि हार्विक देसाई यांचा समावेश आयपीएलमध्ये होणाऱ्या लिलावात करण्यात आलाय. शनिवारी आणि रविवारी आयपीएलचा लिलाव होणार आहे.


बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकल्यावर भारत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचेल. ही मॅच भारतानं जिंकली तर सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.


आयपीएलचा लिलाव होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला याबद्दल माहिती नाही हा दिखावा मी करणार नाही. जवळचा फायदा बघण्यापेक्षा दीर्घकालीन लक्ष्यावर लक्ष ठेवायला मी खेळाडूंना सांगितलं असल्याचं द्रविड इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे.