मुंबई :  टीम इंडिया आणि पाकिस्तान, दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी. या दोन्ही टीममधील सामना म्हणजे थरार, हमरीतुमरी, हायव्होल्टेज ड्रामा असं समीकरण हे गेल्या अनेक वर्षांपासून ठरलेलं आहे. यो दोन्ही संघातील सामन्यांची क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत असतात.  नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने भिडले होते. यावेळेस पाकिस्तानने टीम इंडियावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यानंतर आता पुन्हा हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. (U19 Asia Cup India Pakistan match will be held on 25 December 2021 see the full schedule of the tournament here)
  
यूएईमध्ये 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेनिमित्त हे दोन्ही कट्टर संघ आमनेसामने भिडणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेत एकूण 8 संघ या विजेतेपदासाठी खेळणार आहेत. या एकूण 8 संघांना एकूम 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रृपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान  आणि यूएईचा समावेश आहे. तर बी ग्रृपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, कुवेत आणि नेपाळचा समावेश आहे. या दोन्ही ग्रृपमधील प्रत्येकी 2 संघ हे बाद फेरीत पोहचतील. 


टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान


टीम इंडियाच्या अंडर 19 टीमची या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात ही 23 डिसेंबरपासून करणार आहे. पहिला सामना हा  यूएई विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.  तर यानंतर 25 डिसेंबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. 


पाकिस्तानने टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे 19 वर्षाखालील टीम इंडियाचे खेळाडू हे पाकिस्तानला पराभूत करत या पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहेत. 


आशिया कपसाठी टीम इंडिया : 


हरनूर सिंग पन्नू, अंगक्रिश रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राजवर्धन हंगरगेकर, गर्व सांगवान, रवी कुमार, ऋषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स (फिटनेस टेस्ट आवश्यक)