Udhayanidhi Stalin on Chanting Jai Shri Ram At Pak Players Unacceptable : काल झालेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सगळ्यांच्या लक्षा राहणारा आहे. कालचा सामना हा भारतीय चाहत्यांसाठी फार आनंदाचा आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यानंतर सगळीकडे फटाक्यांचा आतषबाजी आणि जल्लोष सुरु होता. भारतानं सुरुवातीला बॉलिंग घेतल्यानंतर एकामागे एक त्यांनी जशा विकेट घेतल्या त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा होता. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे रिल्स आणि मीम्स पाहायला मिळाले. दरम्यान, या सगळ्यात असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच तामिळनाड मंत्री उदयनिधी स्टॅलिन संतापले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी मॅचमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यावरून उदयनिधी स्टॅलिन यांनी भारतीय चाहत्यांवर संताप व्यक्त केला आहे. खरंतर स्टॅलिन यांनी स्टेडियममधील एक व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंट म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत पाकिस्तानचा खेळाडू हा आऊट झाल्यानंतर पवेलियनमध्ये परत जाताना दिसत आहे. त्याला पवेलिनयच्या दिशेनं जाताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक हे जय श्रीराम ही घोषणा करू लागले होते. त्या व्हिडीओत असलेला खेळाडू हा रिझवान आहे. 



हा व्हिडीओ शेअर करत उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, 'भारत हा त्याच्या खिलाडूवृत्तीसाठी, अतिथी सत्कार आणि अतिथी प्रेम यासाठी जगभरात ओळखला जातो. मात्र, अहमदाबादमध्ये असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक अस्वीकार्य आहे आणि हे अपेक्षा नव्हती. खेळ हा देशांमधली एकता निर्माण करणारी, खरी बंधुता वाढवणारी शक्ती असली पाहिजे. द्वेष पसरवण्याचे साधन म्हणून त्याचा वापर करणे निषेधार्ह आहे.' भारत आणि पाकिस्तानमध्ये काल 14 ऑक्टोबर रोजी झालेला वर्ल्ड कप सामन्यात भारतानं आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. 


हेही वाचा : Photo : सुहाना खानच्या मादक अदांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष


पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानची टीम अवघ्या 191 रन्सवर आटोपली. यावेली पाकिस्तानकडून केवळ बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने चांगली खेळी केली. यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्फोटक खेळी केली. हिटमॅनने 86 रन्सची खेळी केली. भारताने शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट्स राखून पराभव केला.