मुंबई : कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकणारा पाकिस्तानी खेळाडू उमर अकमल (Umar Akmal) सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अकमलच्या घराबाहेर त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. उमर अकमलने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. यानंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Umar Akmal Gets into a Scuffle With Fans at Karachi Residence; Two Apprehended) 


मला जीवे मारण्याचा प्रयत्न : उमर अकमल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमधील लाहोरचे डिफेंस हाऊसिंग ऑथोरिटीमध्ये उमर अकमल (Umar Akmal) याचं घर आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, त्याच्या घराबाहेरच त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. धक्कादायक बाब म्हणजे उमरचे चाहते म्हणून दोन जण आले होते. उमरसोबत सेल्फी काढण्याच्या बहाण्याने हे दोघं त्याच्या जवळ आले. याच दरम्यान त्यांनी उमरवर झडप घेतली. या दोघांनी क्रिकेटर उमर अकमलवर जीवघेणा हल्ला केला. 



उमर अकमल यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.



एक जण ब्रिटनचा असून एक पाकिस्तानी असल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेल्या दोघांनीही सांगितले आहे की त्यांचा असा कोणताही हेतू नव्हता, ते फक्त त्याचे चाहते आहेत. या दोघांवरही अकमल आणि त्याच्या घरातील कर्मचार्‍यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.