बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये उमेश यादवनं १० ओव्हरमध्ये ४ विकेट घेतल्या. याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये १०० विकेट घेण्याचं रेकॉर्ड उमेशनं केलं आहे. चौथ्या वनडेमध्ये स्टिव्ह स्मिथची विकेट घेतल्यावर यादवचं हे रेकॉर्ड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७१वी आंतरराष्ट्रीय वनडे खेळताना उमेश यादवनं १०० विकेटचा टप्पा गाठला आहे. वनडे क्रिकेटमध्ये १०० विकेट घेणाऱ्या भारतीय बॉलर्समध्ये उमेश यादव सहावा आहे. याआधी इरफान पठाणनं ५९ मॅचमध्ये, जहीर खाननं ६५ मॅचमध्ये, अजित आगरकरनं ६७ मॅचमध्ये, जवागल श्रीनाथनं ६८ मॅचमध्ये आणि ईशांत शर्मानं ७० मॅचमध्ये १०० विकेट्स घेतल्या आहेत.