नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय बॉलर्स २० विकेट घेऊ शकतात असा दावा फास्ट बॉलर उमेश यादव याने केला आहे. भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असल्याने उमेशचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते.


आता विदेशात आगेकूच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दक्षिण आफ्रिकेतील पीच पाहता संपूर्ण दौऱ्यात सर्वांची नजर फास्ट बॉलर्सवर असणार आहे.त्यामूळे आमच्याकडून अपेक्षा असणे साहजिकच आहे, असे उमेश याने सांगितले.


घरगूती पिचवर आमच्यासाठी १४ महिने यशस्वी गेले आता विदेशात सफलता मिळविण्याची वेळ आल्याचे त्याने सांगितले. 


फिटनेस आणि योग्य रणनिती 


भारतातील पिचवर वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. यादवचे टेस्ट मॅचमध्ये ९९ विकेट्स झाल्या आहेत.


१ विकेट घेतल्यानंतर त्याच्या १०० विकेट्स पूर्ण होणार आहेत. फिटनेस आणि योग्य रणनिती हे आमच्या यशाचे गमक ठरले आहे.


यामध्ये सातत्य राखल्यास आम्हाला रोखण कठीण असल्याचे यादव ने सांगितले. 


आऊटस्विंगर प्रमुख अस्त्र 


कपिल देव यांच्याप्रमाणे माझी नैसर्गिक बॉलिंग आऊटस्विंगर आहे.  जर मी अधिक आत येणारी बॉलिंग केली तर आऊटस्विंगरपासून दूर जाईन जे मला नकोय असे त्याने सांगितले.


आत येणाऱ्या बॉलसाठी काही बदल करावे लागतील पण आऊटस्विंगर हे माझे प्रमुख अस्त्र असल्याचे तो म्हणतो.