नवी दिल्ली : आयपीएलसोबतच बांग्लादेशमध्ये होणाऱ्या प्रिमिअर लीगमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच एका मॅच दरम्यान शाकिब अल हसन एका अंपायरसोबत वाद करत असल्याची चर्चा रंगली. शाकिब एका मॅचच्या वेळी अंपायरला चुकीचे शब्द बोलत असल्याचं लक्षात आलं. हे सगळं असताना आता मात्र चर्चा रंगतेय ती अंपायरच्या चुकीची. अंपायरने ओव्हर मोजताना चुक केल्याचं समोर आलं आहे. खेळाडूने अंपायरला सांगूनही तो त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.


बांग्लादेश प्रिमिअर लीगमध्ये अंपायरने गोलंदाजाला एका ओव्हरमध्ये ७ बॉल खेळायला लावले. त्या सामन्यानंतर खेळाडूंनी अंपायरची तक्रार केली. मात्र अद्याप त्या अंपायरवर कोणती कारवाई झाली याबाबत माहिती नाही. काय आहे हा नेमका प्रकार? २८ नोव्हेंबर मंगळवारी बीपीएलमध्ये रंगपूर रायडर्स आणि सिलहट सिक्सर्स यांच्या सामना रंगला होता. सिलहट सिक्सर्सची बॉलिंग होती. १६ व्या ओव्हरमध्ये अंपायर महफुजर रहमान यांनी सिलहटच्या गोलंदाज कमरूल इस्लाम रब्बीला एक बॉल जास्त खेळायला सांगितला. अंपायरचं लक्ष नसल्यामुळे ६ बॉल होऊनही त्याला ७ बॉल खेळायला भाग पाडलं.


टीमच्या दुसऱ्या प्लेअरने सांगितले की, आमच्यातील एका प्लेअरकडून जास्त बॉल खेळून घेतला आहे. मला नाही कळत अंपायरचा गोंधळ झाला होता तर त्यांनी थर्ड अंपायरची मदत का घेतली नाही. मात्र आम्ही या प्रकाराची तक्रार केली आहे. आमच्या कॅप्टनने देखील या प्रकारावर प्रश्न उभा केला होता.