ODI World Cup 2023: भारतीय क्रिकेट बोर्डने (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी 17 सदस्य संघाची घोषणा केली आहे. संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय संघात यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केलाय. संघात 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूलाही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता टीम इंडिया (Team India) बुमराहला पर्याय शोधते का? असा सवाल विचारला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे. कर्णदारपदी रोहित शर्मा कायम आहे त्यासोबत टिममध्ये नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघात असा एक 23 वर्षीय युवा गोलंदाज म्हणजेच उमरान मलिकला (Umran Malik) संधी देण्यात आलीये.


भारतात होणार 2023 विश्वचषक


भारतात 2023 च्या विश्वचषकाचं (World Cup 2023) आयोजन होणार आहे. 2011 साली भारतात विश्वचषक झाला होता, तेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारताने तब्बल 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला. इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर 13 वर्षांनी पुन्हा भारतातचं विश्वचषक होऊ शकतो. भारताने 13 वर्षात एकही न जिंकलेली आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) आणि नुकताच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये झालेला पराभव, त्यामुळे आता कर्णधार रोहित शर्माकडे भारतासाठी विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. सध्या भारतीय संघातील जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत यांच्यासह अनेक खेळाडू जखमी आहेत. विश्वचषकापूर्वी हे खेळाडू परतले तर भारतीय संघ आणखी मजबूत होईल पण हे खेळाडू परतले नाहीत तर भारतासाठी चिंतेची बाब असेल.


23 वर्षीय युवा खेळाडूला संधी


जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे  (Umran Malik Career) मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. उमरानने गेल्या वर्षी टी-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. त्यानंतर नोव्हेंबर-2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. उमरानने आतापर्यंत 8 एकदिवसीय आणि तितकेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 11 विकेट्स आहेत.


विश्वचषकात संधी ?


उमरान मलिकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली तर तो आगामी विश्वचषकातही खेळू शकतो. उमरानकडे सध्या अनुभवाची कमतरता असली तरी, ज्याप्रकारे दुखापतींशी झगडत आहेत ते पाहता उमरानला कमी लेखता येणार नाही. मोठी गोष्ट म्हणजे उमरानच्या गोलंदाजीत बरीच धार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL-2023) मध्येही त्याने 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे.


आणखी वाचा - अखेर सरफराजचा संयम सुटला, इंस्टाग्राम स्टोरी अन् बीसीसीआयला दिलं ओपन चॅलेंज!


वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.