India vs New Zealand, 3rd T20I : भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ 3rd T20I) खेळल्या जात असलेल्या अखेरच्या सामन्यासाठी भारताचा कॅप्टन हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मोठा गेम खेळला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) तिसरा सामना खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो असा असणार असल्याने आता दोन्ही संघ सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच आता टीम इंडियामध्ये ( Team India) खतरनाक खेळाडूची एन्ट्री झाली आहे. (Umran Malik replace yuzi chahal in Playing XI IND vs NZ 3rd T20I hardik Pandya played a big game latest sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम टॉस जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी पीच चांगली असल्याने हा निर्णय घेतल्याचं पांड्याने सांगितलं. आयपीएलचा फायनल (IPL Final) सामना याच मैदानावर खेळला गेला होता. त्यामुळे पांड्याला या पीचवर खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे पांड्याने भारताचा युवा धारदार गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik In Playing XI) तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा दिली आहे.


आणखी वाचा - IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर!


टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन (Playing XI of Team India)


शुभमन गिल, इशान किशन (WC), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (C), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.


न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन (New Zealand Playing XI)  


फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (WC), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (C), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर