दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमध्ये या त्रिमूर्तींना संधी मिळणार?
आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळू शकते. यामध्ये 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत.
मुंबई : आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) अखेरच्या टप्प्यात आहे. या मोसमात आतापर्यंत अनेक थरारक सामने पाहायला मिळेाले. या 15 व्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अशा परिस्थितीत या खेळाडूंना आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळू शकते. यामध्ये 3 खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत. (umran malik tilak varma and hardik pandya may be give chance in t 20 series against to south africa)
हार्दिक पंड्या (Hardik Pandya)
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. हार्दिक 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपपासून टीममधून बाहेर आहे. IPL 2022 मध्ये हार्दिक पांड्याने खूप चांगला खेळ दाखवला आहे. त्याने आयपीएल 2022 च्या 10 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या आहेत. तसेच 4 विकेट्स घेतल्या आहेत. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने 10 पैकी 8 सामने जिंकून प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं आहे. पात्रता मिळवली आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूला टीम इंडियात पुन्हा स्थान मिळू शकते.
तिलक वर्मा (Tilak Verma)
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने अत्यंत खराब कामगिरी केली. पण 19 वर्षीय युवा फलंदाज टिळक वर्माने मुंबई इंडियन्ससाठी जबरदस्त धावा केल्या. तिलकने 15 व्या मोसमातील 9 सामन्यात 307 धावा केल्या आहेत. तिलकमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता आहे. तिलक अतिशय चमकदार फलंदाजी करत आहेत. अशा स्थितीत त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळू शकते. तिलक मधल्या फळीत फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत.
उमरान मलिक (Umran Malik)
उमरान मलिकने (Umran Malik) आयपीएल 2022 मध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. उमरानच्या बॉलचा सामना करणं आव्हानात्मक आहे. उमरान 150 किलोमीटर वेगाने चेंडू टाकू शकतो. यॉर्कर आणि बाऊन्सर गोलंदाजी करण्यातही तो पारंगत आहे. सध्या उमरान हा सनरायझर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा आहे. IPL 2022 मध्ये उमरानने गुजरात टायटन्सविरुद्धच्या 5 विकेट्ससह 9 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता कोणाचं नशिब फळफळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
मॅच तारीख ठिकाण
पहिला सामना 9 जून दिल्ली
दुसरा सामना 12 जून कटक
तिसरी मॅच 14 जून वायझॅग
चौथा सामना 17 जून राजकोट
पाचवी मॅच 19 जून बंगळुरु