क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो अनेक देशात खेळला जातो. भारतीयांसाठी तर क्रिकेट हा खेळ जीव की प्राण आहे. या खेळात अनेक रेकॉर्ड बनले जातात ज्याचा फॉलोअपही ठेवला जातो.  सुरक्षेचा विचार करून सध्याच्या काळात असे अनेक नियम लागू करण्यात आले आहेत, ज्याचा फायदा फलंदाजांना झाला. जबरदस्त गोलंदाजी करण्याऱ्या खेळाडूंसमोरही फलंदाज बिनधास्त खेळतात. परंतु आधीच्या काळात असे न्हवते. फलंदाजांना अत्यंत धोकादायक गोलंदाजांचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत खेळाडूंना खूप दुखापतही व्हायची. पण यातूनही एका फलंदाजांने आपल्या फलंदाजीने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले.


क्रिकेट जगताचा 'डॉन'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी काळात असा एक असा खेळाडू होता ज्याने क्रिकेट जगतात आपली वेगळीच छाप सोडली होती. त्या खेळाडूला 'द मॅजिशियन ऑफ द बॅट', 'द बॉस ऑफ क्रिकेट' आणि 'द डॉन' असेही म्हणतात. या खेळाडूचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी झाला होता. या खेळाडूने  क्रिकेटच्या जगात असे अनेक विक्रम केले जे आजही कायम आहेत. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं नसेल तर आम्ही सांगतो की हा खेळाडू आहे महान ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डॉन ब्रॅडमन ( don bradman). 


अनोख्या फलंदाजीने केले सगळ्याच आश्चर्यचकित


ब्रॅडमन हे फक्त एक फलंदाज नव्हते तर ते क्रिकेटच्या इतिहासातील एक दिग्गज खेळाडू होते. त्यांनी क्रिकेटला एका नवीन उंचीवर नेले. त्यांची सरासरी ९९.९४ इतकी होती, जी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी केवळ ऑस्ट्रेलियासाठीच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी अनेक विक्रम केले. त्यांचा एक असा रेकॉर्ड आहे जो मोडणे खूप कठीण आहे. तब्ब्ल 86 वर्षांपासून हा रेकॉर्ड कायम आहे. 


'हा' विक्रम आजही कायम आहे


ब्रॅडमन हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग शतके झळकावणारा खेळाडू आहे. त्यांनी 1937-38 मध्ये सलग 6 कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावली. हा विक्रम आजही कायम आहे. केवळ तीनच खेळाडू या जवळ पोहोचू शकले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावे नाहीत. 


आहे अजून एक विशेष रेकॉर्ड 


ब्रॅडमन यांनी 1928 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्यांनी कांगारू संघाकडून 52 सामने खेळला. या कालावधीत त्यांनी 80 डावांमध्ये 99.94 च्या सरासरीने 6996 धावा केल्या. त्यांनी 29 शतके आणि 13 अर्धशतके केली. ब्रॅडमन यांनी पदार्पण केल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९३० मध्ये एक मोठा विक्रम केला जो आजतागायत मोडलेला नाही. ब्रॅडमन हे कसोटी इतिहासातील एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यांच्या या विक्रमाच्या जवळपासही कोणीच जाऊ शकलेले नाही. त्यांनी 5 कसोटीच्या 9 डावात 974 धावा केल्या होत्या. हा विक्रम आजही कायम आहे.