क्वीन्स्टन : भारताच्या अंडर 19 संघाने वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला पराभवाची धूळ चारत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. वर्ल्डकपमध्ये भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. यातील 5 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला.


सर्वाधिक वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ


1. पाकिस्तान - 8 (विजय 5, पराभव  2)


2. ऑस्ट्रेलिया - 8 (विजय 4, पराभव  3)


3. भारत - 7 (विजय 5, पराभव  1)


क्वार्टरफायनलमध्ये भारताने बांगलादेशला तब्बल 131 धावांनी हरवले आणि सेमीफायनल गाठली. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करतोय.


सेमीफायनलमध्ये पाकिस्तानशी मुकाबला


क्वार्टरफायनलमध्ये भारताने बांगलादेशला हरवल्याने भारतालाच सेमीफायनलमध्ये पाकिस्तानशी मुकाबला होणार आहे. 30 तारखेला हा सामना रंगणार आहे.


भारताचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास


भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे या दोन दुबळ्या संघांना सहज हरवले. त्यानंतर आता बांगलादेशला हरवत भारताने सेमीफायनल गाठलीये