मुंबई : Under-19 World Cup : अंडर-19 विश्वचषक उपांत्य फेरीत भारतीय  (India) संघाने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला (Australia) 96 धावांनी पराभूत केले. आता भारत अंतिम सामन्यात शनिवारी इंग्लडशी लढत देणार आहे.( India v England final cricket match) या लढतीकडे आता लक्ष लागले आहे. टीम इंडिया हा विश्वचषक आणणार का, याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 41.5 षटकांत 194 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून लचलान शॉने सर्वाधिक 51 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना विकी ओस्तवॉलने तीन विकेट घेतल्या. कर्णधार यश धुल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आता शनिवारी अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.


कर्णधार यश धुल (Yash Dhull) याचे शतक आणि शेख रशीदच्या 204 धावांच्या 
भक्कम भागीदारीमुळे भारतीय टीमने निर्धारित 50 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 290 धावा केल्या.  धुलने 110 धावा केल्या तर रशीदने 94 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून जॅक निस्बेट आणि विल्यम साल्झमन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 291 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम 41.5 षटकांमध्ये 194 धावांमध्ये गुंडाळली गेली.  



नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने आठव्या षटकात फॉर्मात असलेला सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी (6) याची विकेट 16 धावांत गमावली. ऑस्ट्रेलियाच्या विल्यम साल्झमनने 57 धावांत 2 बळी घेतले. दुसरा सलामीवीर हरनूर सिंह (16)ही फार काळ टिकू शकला नाही आणि 37 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. धुल आणि रशीद यांनी संयमी खेळी करत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले.